उच्च शिक्षणासाठी
तुमच्यासाठी अनुकूल केलेला शैक्षणिक मार्ग
Google कडून फ्री उपलब्ध असलेल्या लहान, स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणाऱ्या सेशनसह व्यवहारिक AI कौशल्ये तयार करा. कोणत्याही क्रमाने ३० ते ४५ मिनिटांची मॉड्यूल पूर्ण करा आणि तुमच्या भूमिकेनुसार कमाल ८ बॅज मिळवा.
AI च्या प्रगतीसाठी उच्च शिक्षण तयार करणे
AI चा खरोखरच परिणाम होण्यासाठी, शिक्षकांनी नेतृत्व करणे आवश्यक आहे. ही लहान, स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणारी AI मॉड्यूल तुमची कल्पना प्रत्यक्षात आणण्यात मदत करतात. शिक्षणात बदल घडवण्यासाठी आणि शैक्षणिक परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्च शिक्षणात Gemini वापरण्यासंबंधित सर्वोत्तम पद्धती जाणून घ्या.
तुमच्या शेड्यूलसाठी डिझाइन केलेले
केवळ ३० ते ४५ मिनिटांमध्ये, फॅकल्टीवर केंद्रित Gemini वापर प्रकरण जाणून घ्या आणि तुमची नवीन AI साक्षरता व कौशल्ये दाखवण्यासाठी बॅज मिळवा.
तुमच्या आवश्यकतांवर केंद्रित
भारतातील शिक्षकांच्या आवश्यकतांनुसार अलाइन केलेल्या सेशनसह व्यावहारिक कौशल्ये मिळवा.
सतत अपडेट होणारा कंटेंट
२०२७ च्या सुरुवातीला नवीन आशय रिलीझ केला जाईल.
शैक्षणिक अनुभव वर्धित करणारी कौशल्ये
उच्च शिक्षणामध्ये अर्थपूर्ण शिक्षण अनुभव देण्यासाठी आणि दैनंदिन कार्ये स्ट्रीमलाइन करण्यासाठी AI वापरणे जाणून घ्या. लक्ष केंद्रित करण्यासारख्या गोष्टींमध्ये संज्ञानात्मक सहभाग, समावेशक डिझाइन आणि विद्यार्थी सपोर्ट, एजंटिक वर्कफ्लो व संस्थात्मक परिणाम यांचा समावेश आहे.
Gemini सह तुमचा प्रभाव पाडण्यासाठी तयार आहात का?
ही संधी मुळीच सोडू नका — नवीनतम, फ्री AI प्रशिक्षणांबद्दल माहिती मिळवत राहण्यासाठी sign up करा.
प्राथमिक आणि माध्यमिक यांसाठी
AI सहजपणे वापरण्याचा तुमचा मार्ग
Google कडून फ्री उपलब्ध असलेल्या लहान, स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणाऱ्या सेशनसह व्यवहारिक AI कौशल्ये तयार करा. कोणत्याही क्रमाने ३० मिनिटांची मॉड्यूल पूर्ण करा आणि तुमच्या भूमिकेनुसार ८ बॅज गोळा करा.
प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकासाठी AI साक्षरता
नेतृत्व करा आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षणामध्ये AI ला खरोखरच प्रभावी बनवा. शिक्षकांवर केंद्रित असलेले, स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणारे हे AI साक्षरता प्रशिक्षण तुम्हाला परिवर्तनात्मक शिक्षणाला चालना कशी द्यावी आणि प्रशासकीय कामांचा व्याप कमी करून शिकवण्यासाठी वेळ कसा वाचवावा, हे शिकवेल.
तुमच्या शेड्यूलसाठी डिझाइन केलेले
केवळ ३० मिनिटांमध्ये, वर्गासाठी तयार Gemini वापर प्रकरण जाणून घ्या आणि तुमचे नवीन कौशल्य दाखवण्यासाठी बॅज मिळवा.
तुमच्या आवश्यकतांवर केंद्रित
भारतातील शिक्षकांच्या आवश्यकतांनुसार अलाइन केलेल्या सेशनसह व्यावहारिक कौशल्ये मिळवा.
सतत अपडेट होणारा कंटेंट
२०२७ च्या सुरुवातीला नवीन आशय रिलीझ केला जाईल.
AI वापरून विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परिणाम वर्धित करा
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी शिक्षकांसाठी पेडॅगोजीकल टूल म्हणून AI एक्सप्लोर करा. Gemini वापरण्यासाठी सर्वोत्तम पद्धती जाणून घ्या.
Gemini सह पुढे जाण्यास तयार आहात का?
प्राथमिक आणि माध्यमिक व्यावसायिक शिक्षणासाठी हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. नवीनतम, फ्री AI प्रशिक्षणांबद्दल माहिती मिळवत राहण्यासाठी sign up करा.
शिकण्यासाठी आणि कनेक्ट करण्यासाठी आणखी संधी एक्सप्लोर करा
सामान्य प्रश्नांची उत्तरे मिळवा
Google चा AI प्रशिक्षण उपक्रम हा डिजिटल साक्षरतेमध्ये भक्कम पाया तयार करण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामुळे शिक्षकांना त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या अध्यापन व संशोधन पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी Google ची सुरक्षित आणि डेटा संरक्षित AI टूल वापरता येतात. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवणे, प्रशासकीय अतिताण कमी करणे आणि शिक्षक व प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना AI इंटिग्रेट केलेल्या भविष्यासाठी जबाबदारीने तयार करणे हे या प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे.
Gemini for Education आणि Gemini Notebook यांसारख्या Google टूलच्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे AI ची मूलभूत संकल्पना, चिकित्सक विचार करण्याची कौशल्ये आणि जबाबदारीने वापर शिकवण्यासाठी डिझाइन केलेल्या या सिरीझमध्ये Google तंत्रज्ञान भागीदार आहे. NEP २०२० शी अलाइन केलेला हा प्रोग्राम आमच्या भारतीय भागीदारांसोबत विकसित केला गेला आहे, जेणेकरून शिक्षकांना AI ची व्यापक समज मिळेल आणि विद्यार्थ्यांना ते सुरक्षितपणे व प्रभावीपणे वापरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात मदत होईल. हा प्रोग्राम भारतातील प्रत्येक शिक्षकाला सर्वोत्तम AI साक्षरता प्रशिक्षणाचा अॅक्सेस पुरवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा विस्तार आहे आणि वर्गांमध्ये व त्यांच्या प्रशासकीय वर्कफ्लोमध्ये अध्यापनशास्त्रात AI वापरून त्यांना सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
Google AI Educator Series (GES) ही व्यग्र शैक्षणिक शेड्यूलमध्ये समाविष्ट करण्यासाठी डिझाइन केलेल्या लहान, स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणाऱ्या मॉड्यूलमध्ये विभागली गेली आहे. ते तीन मुख्य वर्गवाऱ्यांमध्ये विभागले आहे: मूलभूत आकलन, पेडॅगोजीकल ॲप्लिकेशन्स (प्राथमिक आणि माध्यमिकसाठी इयत्ता पातळीनुसार विशिष्ट) व अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्लिकेशन.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी: प्रत्येक मॉड्यूल ३० मिनिटांचे असते.
उच्च शिक्षण विद्याशाखेसाठी: प्रत्येक मॉड्यूल ३० ते ४५ मिनिटांचे असते.
Google AI Educator Series ही स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणारे वैयक्तिक मार्ग देऊ करते. अधिक सर्वसमावेशक आशयासाठी, कृपया Google for Education शिक्षण केंद्र द्वारे इतर प्रशिक्षण एक्सप्लोर करा. दोन्ही ट्रॅक लहान प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यावर डिजिटल सर्टिफिकेट बॅज देतात.
मॉड्यूल आता लाइव्ह आहेत! २०२७ च्या सुरुवातीला नवीन आशय रिलीझ केला जाईल.
Google AI Educator Series ही वर्गातील अध्यापनशास्त्र, शिक्षकांचे कौशल्य वाढवणे आणि सर्वसमावेशक शिक्षण यांमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करून भारताच्या NEP २०२० (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०) च्या मुख्य आदेशांना व दृष्टिकोनाला सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
प्रत्येक शिक्षकासाठी प्रशिक्षण निःशुल्क आहे. प्रशिक्षणाच्या शेवटी, शिक्षकांना लहान प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर बॅज मिळतील.
Google AI Educator Series (GES) ही शिक्षकांना व्यावसायिक विकास आणि सतत शिकण्यासाठी स्पष्ट मार्ग देते. मुख्य फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- व्यावसायिक ओळख: पूर्ण केलेल्या प्रत्येक मॉड्यूलसाठी डिजिटल बॅज मिळवा.
- अधिकृत सर्टिफिकेशन: किमान ६ मॉड्युल पूर्ण केल्यावर Google सर्टिफिकेट मिळवा.
- वर्गातील प्रत्यक्ष परिणाम: विद्यार्थ्यांच्या आवश्यकतांना आणखी चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यासाठी धड्याचे नियोजन, प्रशासकीय ऑटोमेशन आणि सूचना पर्सनलाइझ करणे यांकरिता वेळेची बचत करणारी कौशल्ये मिळवा.
- Google AI Educator Series (GES) ही वेगळी आहे, कारण ती शिक्षक कसे शिकतात आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेला वेळ यांनुसार तयार केली आहे.
- GES ही NEP २०२० शी सुसंगत आहे आणि विशेषतः स्वतःच्या गतीने पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
- प्रशिक्षणामध्ये कोणत्याही क्रमाने घेता येतील अशा लहान मॉड्यूलचा समावेश आहे आणि ते शिक्षकांच्या वेळापत्रकात सहजपणे बसवण्याच्या उद्देशाने आहे.
- हे प्रशिक्षण शिक्षक आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने तयार केले जात आहे – शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी – त्यांच्या वर्कफ्लोनुसार तयार केले आहे
तुम्हाला Google AI प्रशिक्षण पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास, तुम्ही आवड नोंदणी पत्र भरू शकता.
होय. स्थानिक तंत्रज्ञान इंटिग्रेटर आणि निर्देशात्मक प्रशिक्षकांना कार्यशाळांचे नेतृत्व करण्यासाठी तयार करण्याकरिता Google संपूर्ण भारतामध्ये प्रादेशिक ट्रेन-द-ट्रेनर इव्हेंट ऑफर करते. याव्यतिरिक्त, सर्व सेशनमध्ये डाउनलोड करण्यायोग्य स्लाइड डेक आणि सर्वसमावेशक फॅसिलिटेटर मार्गदर्शक समाविष्ट आहेत, जेणेकरून संस्था स्वतंत्र, अंतर्गत प्रशिक्षण दिवस होस्ट करू शकतात. विशिष्ट विनंतीसाठी, in-ges-support@google.com शी संपर्क साधा
- आम्हाला माहीत आहे, की झटपट उत्तरांसाठी AI टूलवर अवलंबून राहणे खूप सोपे असू शकते. असे असले, तरीही विद्यार्थ्यांशी बोलल्यावर आम्हाला समजले, की फक्त उत्तर मिळवण्याऐवजी विषय समजून घेण्यासाठी AI टूलसोबत अधिक सखोलपणे गुंतून राहण्याचा पर्याय अनेक विद्यार्थ्यांना हवा आहे. त्यांना असे टूल हवे आहे, जे अभ्यासातील सोबती म्हणून काम करू शकेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सखोल आकलनासाठी हवी ती मदत करेल.
- लोकांसाठी शिकणे अधिक सोपे व्हावे, याकरिता आम्ही Gemini डिझाइन केले आहे. उदाहरणार्थ, Gemini मधील Guided Learning हे थेट उत्तरे मिळवणे आणि कोणत्याही पाठिंब्याशिवाय संकल्पना समजून घेण्यासाठी संघर्ष करणे यामधील एक मजबूत मध्यम मार्ग देते आणि आम्हाला आशा आहे, की यामुळे लोकांना कठीण विषयांमध्ये अधिक सखोलपणे गुंतवून ठेवता येईल, ज्यामुळे त्यांच्या चिकित्सक विचारसरणीचा खरोखर विकास होईल.
- हे टूल LearnLM द्वारेदेखील समर्थित आहे, जे खास शिकण्यासाठी तयार केलेल्या आमच्या मॉडेलचे कुटुंब आहे. LearnLM हे शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक तज्ञांच्या सहकार्याने विकसित केले गेले होते व त्यामध्ये सक्रिय शिक्षणाला प्रेरणा देणारी, शिकणाऱ्यांना संज्ञानात्मक भार व्यवस्थापित करण्यात मदत करणारी, त्यांच्या आवश्यकतांशी जुळवून घेणारी, उत्सुकतेला प्रेरणा देणारी आणि मेटाकॉग्निटिव्ह विचार करण्यास प्रोत्साहन देणारी शिक्षण विज्ञानाची तत्त्वे समाविष्ट केली आहेत. आम्हाला आमच्या मॉडेलच्या केंद्रस्थानी शैक्षणिक तत्त्वे तयार करायची होती, कारण आम्ही पाहिले आहे, की AI हे शैक्षणिकदृष्ट्या अधिक सुदृढ असते, तेव्हा त्याचा शिक्षणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- हे प्रश्न लक्षात घेऊन AI टूलचे मूल्यांकन करणारी फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी आम्ही Digital Promise सोबतदेखील काम केले आहे. हे फ्रेमवर्क शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधन यांमधील ५० हून अधिक स्वतंत्र तज्ञांच्या इनसाइटवर आधारित AI डिझाइन व लागू करण्यासाठी शिफारशी आणि स्रोत पुरवते.
- याव्यतिरिक्त, Google डोमेन पातळीवर अॅडमिन नियंत्रणे पुरवते, जी संस्थेच्या अॅडमिनना टूलचा अॅक्सेस नियंत्रित करण्याची क्षमता देतात.